मावा केक रेसिपी
केकची सामग्री मोजण्यासाठी वजन काटा किंवा मोजायचे चमचे वापरा.
साहित्य:
2. बटर – 75 ग्रॅम (1/2 कप)
3. मावा – 75 ग्रॅम
4. पावडर साखर – 70 ग्रॅम (1/2 कप)
5. मिल्क पावडर- 50 ग्रॅम (1/2 कप)
6. दूध – 150 मि.लि.
7. रवा – 2 टीस्पून
8. ड्रायफ्रूट्स – 25 ग्रॅम (कापून घ्या)
9. बेकिंग पावडर- 1/2 टीस्पून
10. खायचा सोडा – 1/2 टीस्पून
11. जायफळ पूड (ऐच्छिक)
12. केसर किंवा खाद्य रंग (ऐच्छिक)
कृती:
– 100 मि.लि. दूध हलके गरम करून थंड होऊ द्या.
– त्यात 2 टीस्पून रवा टाका, 50 ग्रॅम मिल्क पावडर आणि 70 ग्रॅम पावडर साखर घालून चांगले मिक्स करा.
– जायफळ पूड टाका (ऐच्छिक).
– 10 मिनिटे झाकुन ठेवा, जेणेकरून रवा चांगला फुलून येईल.
– एका भांड्यात 75 ग्रॅम अनसॉल्टेड बटर आणि 75 ग्रॅम मावा मिक्स करा.
– हाताने किंवा बिटरसह चांगले फेटून घ्या.
– मावा एसेन्स (ऐच्छिक) घालू शकता.
– मावा-बटरच्या मिश्रणात रवा आणि दूधाचे मिश्रण हळूहळू घाला.
– उरलेले 50 मि.लि. दूध टाकून बिटरसह किंवा हाताने चांगले फेटून घ्या.
– बॅटर हे गाठी विरहित / गुळगुळीत झाले पाहिजे.
– 125 ग्रॅम मैदा, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून खायचा सोडा चाळून घ्या.
– त्यात कापलेले ड्रायफ्रूट्स मिसळा.
– उरलेले 50 एम एल दूध टाकून मैदा आणि बॅटर नीट मिक्स करून घ्या.
– चमच्याने ओतताना बॅटर रीबिनासारखे दिसले पाहिजे.
– 6 इंच गोल/चौरस टिनला बटरने ग्रीस करा.
– त्यावर मैदा भुरभुरवा (ग्रीसिंग आणि डस्टिंग).
– कुकरमध्ये पाणी टाकू नका.
– झाकणाची रिंग व शिट्टी काढून 10 मिनिटे प्रीहीट करा.
– तयार बॅटर केक टिनमध्ये ओता व सजावटीसाठी वर ड्रायफ्रूट्स टाका.
– टिन स्टँडवर ठेवा आणि कुकरचे झाकण लावा.
– मध्यम आचेवर 40-50 मिनिटे बेक करा.
– टूथपिक घालून तपासा, साफ बाहेर आली तर केक तयार आहे.
– केक थंड झाल्यावर टिनमधून काढा.
– स्लाईस करून सव्र्ह करा.
टीप:
– मावा नसेल तर स्किप करू शकता. साधा केकही अप्रतिम लागतो.
– ओव्हन वापरत असाल तर 180°C वर 35-40 मिनिटे बेक करा.
Recipe by @Ujjwal cakes
Follow on YouTube also- Ujjwal cakes